Free Seminar on Changed Syllabus of 10th std.

जून २०१३ पासून इयत्ता १० वीच्या भाषा आणि समाजशास्त्र या विषयांचा अभ्यासक्रम बदलत आहे. तसेच, गणित आणि विज्ञान या महत्त्वाच्या विषयांच्या मूल्यमापन योजनेमध्ये महत्त्वाचे बदल होत आहेत. नवीन अभ्यासक्रम हा NCERT ने ठरवलेल्या धोरणानुसार असून संपूर्ण देशभर सारखाच अभ्यासक्रम आणि सारखीच परीक्षापद्धती राबवण्याच्या शासनाच्या निर्णयानुसार आहे. साहजिकच, याबाबत सखोल माहिती जाणून घेण्यासाठी सध्या ९ वीला असलेले विधार्थी आणि पालक उत्सुक आहेत. म्हणूनच, एड्नेक्सा या Online Education क्षेत्रातल्या संस्थेने ‘वेध दहावीचे ‘ या विषयावर मोफत मार्गदर्शन सत्र आयोजित केले आहे.

विद्यार्थी व पालक यांच्यासाठी तज्ज्ञांची व्याख्याने व त्यांच्याशी प्रश्नोत्तरातून संवाद असा हा मोफत कार्यक्रम रविवार दि. २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० ते ११ या वेळात यशवंतराव नाट्य मंदिर, कोथरुड, पुणे येथे आयोजित केला आहे. इयत्ता ९ वीत शिकणाऱ्या मराठी, इंग्रजी व सेमी-इंग्रजी या सर्व माध्यमांच्या विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पालकांसाठी हा कार्यक्रम खुला आहे. महाराष्ट्र टाइम्स या उपक्रमाचा मिडिया पार्टनर आहे.

१० वीचा सर्व विषयांचा अभ्यासक्रम आणि मूल्यमापन पद्धत नुकतीच जाहीर झाली आहे. याबाबत विद्यार्थी व पालकांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. म्हणूनच, प्रस्तुत कार्यक्रमात इयत्ता १० वीचे सर्वसाधारण स्वरूप, विज्ञान व गणिताचा अभ्यासक्रम आणि नवीन मूल्यमापन पद्धत (evaluation scheme) या विषयावर राष्ट्रपती पुरस्कार विजेते ज्येष्ठ शिक्षक डॉ. अ. ल. देशमुख आणि प्रा. संजय रानडे मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, समाजशास्त्र विषयाच्या नवीन अभ्यासक्रमावर श्री. संदीप वाटवे यांचे भाषण होणार आहे.

या निमित्ताने नवीन अभ्यासक्रमात ज्ञानरचनावादाचे महत्त्व, एकत्रित पद्धतीने उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षण (Group Study), अभ्यासाचे नियोजन आणि विद्यार्थी-पालक-शिक्षक या त्रिकोणाची गरज या विषयांवर तज्ज्ञ शिक्षकांचे विचार ऐकण्याची संधी विद्यार्थी व पालकांना मिळणार आहे.

अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी व पालकांनी कृपया पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा : 9011041155, 9011031155. अथवा ‘www.ednexa.com’ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: