How to crack SSC English?

विद्यार्थी मित्र / मैत्रिणींनो,

English विषयाचे अनुभवी शिक्षिका सौ. शोभा क्षीरसागर तुमच्या सोबत काही important टिप्स share करणार आहेत

इंग्रजी प्रथम भाषेचा पेपर गणित व शास्त्र या दोन विषयांप्रमाणे भरपूर मार्क मिळवून देणारा नसतो. कारण ही प्रथम भाषा आहे ज्यामध्ये आपली mastery किंवा command ही अति उच्च दर्जाची असावी अशी अपेक्षा आहे. पण एकूणच इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचे इंग्लीश विषयाचे पेपर तपासले असता असे निदर्शनास येते की त्यांचा कल्पना छान असतात पण अभिव्यक्ती किंवा expression मध्ये “तोच तो पणा ” जाणवतो. मुळात शब्द भांडार अतिशय तोटका आहे याची जाणीव होते. म्हणून पेपर मधे खूप स्कोअर झालेला दिसत नाही. आपण सर्वांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की , भाषा विषयामध्ये पुरेपूर मार्क मिळविण्यासाठी आपली भाषा समृद्ध असणे अत्यंत आवश्यक आहे, व भाषेचे कौशल्य साध्य करायला १ वर्षाचा काळ पुरेसा नसतो. कला ही सातत्याने आत्मसात करायला हवी. तिचा ध्यास घ्यायला हवा म्हणून ८ वी पासूनच भाषेचे कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रयत्न  केले पाहिजे. म्हणून “वाचन” हा एकमेव मार्ग आपल्याला निवडावा लागेल. “वाचाल तर वाचाल” हे कुठल्याही भाषेच्या अभ्यासासाठी लागणारे पहिले तंत्र आहे. इंग्रजीच्या बाबतीत तर काळजीपूर्वक वाचणे हे जास्त महत्वाचे आहे कारण नुसते वर वर वाचन करून माहिती मिळेल पण शब्दांची ओळख व spelling चा सराव मात्र काळजीपूर्वक – लक्ष देऊन वाचण्यानेच होणार आहे.

How to learn English for SSC Exams?

इंग्रजी  (प्रथम भाषा ) चा पेपर ३ तासांचा व ८० मार्कांसाठी असतो. यामध्ये प्रामुख्याने पाठ्य पुस्तकावर आकलनासाठी दिलेल्या उताऱ्यांवरील  प्रश्न विचारलेले असतात. अधिकतर विद्यार्थ्यांचे मार्क (comprehension passage) आकलनासाठी दिलेल्या उताऱ्यांवरील प्रश्नांमध्ये जातात. कारण उघड आहे. उतारा प्रश्नपत्रिका येणार आहे असे म्हणून विध्यार्थी धड्यांचे सखोल वाचन करीत नाहीत. त्यामळे उताऱ्या मधील अवघड शब्दांचे अर्थ ते जाणत नाही व लेखकाच्याच शब्दांत (म्हणजे cut and paste) उत्तरे लिहिल्यास परीक्षक मार्क देत नाहीत, शिवाय उताऱ्यांमधील नाम, विशेषण, क्रिया विशेषण, इत्यादींचा परिचय असणे आवश्यक आहे. उताऱ्यांवरील प्रश्नांची मुद्देसूद व नेटकी (precise) उत्तरे लिहिणे आवश्यक आहे. फापट पसारा वाढविला की मार्कांमध्ये काटछाट होणार हे निश्चित आहे.

प्रामुख्याने इंग्रजी मध्ये पेपर मधे चार विभाग असतात यामध्ये पहिल्या भागात उताऱ्यांवरील प्रश्न Prose lessons, Poems व Rapid Reader अशा पाठ्यपुस्तकातील पाठांवर आधारित प्रश्न असतात. व्याकरणा वरील प्रश्न केवळ विद्यार्थ्यांचे इंग्रजीचे ज्ञान चाचपण्यासाठी ४ मार्कांचा असतो. शेवटच्या विभागामध्ये लेखन कौशल्याची पारख केली जाते. अशाप्रकारे एकूण पेपरचा आराखडा आहे. प्रश्नांचे स्वरूप लक्षात घेऊन अभ्यास करणे केव्हाही हिताचे ठरते. म्हणून आधी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आपण पहिले. आता यावरील अभ्यास कसा करावा याबद्दल आपण सविस्तर विवेचन करूया.

अभ्यासातील सातत्य आपल्या प्रगतीचा आलेख उत्तम होण्यास मदत करते. केवळ पाठ्यपुस्तकातील पाठांचे वाचन करणे व त्या धड्याचा प्रश्नोत्तरांचे लिखाण करणे याला अभ्यास म्हणता येणार नाही. हा अभ्यासाचा पहिला टप्पा समजायला हरकत नाही अभ्यास म्हणजे वारंवार पाठाचे वाचन करून त्यावर चिंतन करणे, (समजून घेणे ) हे महत्वाचे आहे.

“Read to understand,

understand to assimilate

Assimilate to express in a proper way”

या ओळी लक्षात घेऊन अभ्यासाचा श्री गणेशा करायला हवा. जे जे वाचाल ते लक्षपूर्वक वाचा व त्याचा आशय समजून घ्या. एकदा आशय लक्षात आल्यावर स्वतःच्या शब्दांत उत्तरांची मांडणी करणे सोपे जाते. वारंवार वाचन व लेखनाचा सराव केला म्हणजे आपला आत्मविश्वास वाढतो. यामुळे आपल्या चुकांचे प्रमाण कमी होऊन लेखन सुधारते धड्याखालील Glossary अगदी आठवणीने वाचावी त्यामुळे vocabulary वाढते. Hurry leads to worry ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी. घाईमुळे काम लवकर होईल पण कामाचा दर्जा चांगलाच असेल याची खात्री देता येणार नाही. मी अनेक विद्यार्थ्यांचे केवळ घाईमुळे नुकसान झाल्याचे पहिले आहे. काही वर्षापूर्वी अकबर आणि बिरबलाच्या गोष्टीचा पहिला धडा होता. मुले पहिल्याच धड्यावर प्रश्न विचारला आहे म्हणून excite होऊन घाईघाईने उत्तरे लिहिण्यास सुरुवात करीत असत. 40% मुलांचे लिहिताना Akbar चे स्पेलिंग लिहिताना Abkar आणि birbal चे spelling Bribal असे असायचे. केवळ excitement म्हणून किंवा पेपर लिहून उरकण्याची घाई म्हणून tension अशा दोन कारणांसाठी अनेक मुले स्वतःचे हातचे मार्क घालवून बसतात. यावर उपाय असा की, उत्तरपत्रिका वाचून पाहावी. पण असे सहसा घडत नाही.

तसेच आणखी एक मजेशीर गोष्ट अशी की पद्य उताऱ्यांवरील प्रश्नांची उत्तरे ही गद्यात असावीत ही एक रास्त अपेक्षा आहे. पण बरेच वेळेला कवितेवरील प्रश्न वाचून विद्यार्थी कवितेच्या ओळी जशाच्या तशा Quote करतात.

e.g.

Q: What is the effect of exercise on flab

उत्तरांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी लिहितात :-

Ans : Exercise causes the flab to crash and burn.

हे उत्तर जरी technically बरोबर असले तरी भाषेच्या दृष्टीने आदर्श उत्तर असे हवे की :-

1. Physical exercise helps to reducce the weight and burn the calories.

अशाच प्रकारचा अनुभव Rapid Reader वरील गोष्टींच्या आधारे विचारलेल्या प्रश्नांच्या लिखाणामध्ये येतो. गोष्ट माहित असते, केवळ लेखनाचा सराव नसल्यामुळे १ मार्काच्या प्रश्नाचे उत्तर “ वाढता वाढता वाढे” करत करत १ परिच्छेद तयार होतो, नेमके उत्तर त्यातून शोधून घेण्याचे कष्ट परीक्षकालाच करावे लागतात. म्हणून प्रश्न नीट वाचून, समजून घेऊन, योग्य ते उत्तर थोडक्यात लिहिण्याची प्रॅक्टीस करणे फार गरजेचे आहे. सर्वात सोपा उपाय मागील २ किंवा ३ वर्षाच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचे लेखन करून सराव करणे. यामुळे आपल्याला आपल्या लिखाणाच्या वेगाचा पण अंदाज येतो व प्रश्नाचे उत्तर अचूक आहे की नाही हे पडताळून पाहता येते. कारण परीक्षेचा पेपर लिहिताना (Time Management) वेळेचे नियोजन ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. याकडे कधीही दुर्लक्ष करून चालणार नाही.

लेखन कौशल्याच्या भागामध्ये Letter Writting, Report Writting, Diaologue Writting, Interview Questions etc. यांची वारंवार  उजळणी करावी. Expansion of an idea (कल्पना विस्तार) साठी आपल्या वाचनाचा पुरेपूर उपयोग होतो कारण “Reading is always reflected in writing.” थोरा मोठ्यांचे विचार, काही चांगली Quotations किंवा चांगल्या शब्दांचा साठा आपल्याला इथे वापरता येतो. प्रत्येक प्रश्नाला ५ मार्क याप्रमाणे या विभागात ५ प्रश्न सोडवायचे असतात. भरपूर option असल्यामुळे काही विद्यार्थी गोंधळात पडतात. परंतु ज्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला उत्तम रीतीने सादर करता येईल किंवा ज्याच्या लिखाणाची आपली चांगली तयारी झाली आहे असेच प्रश्न उत्तरपत्रिकेत लिहून परीक्षकाला खुश करायचा प्रयत्न करावा.

भाषेच्या पत्रिकेमधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे उत्तम सादरीकरण. ज्याचा पेपर सुवाच्य अक्षरात व्यवस्थितपणे सादर केलेला आहे त्याचे वाचन करणे परीक्षकाला नक्की आवडेल, “A thing of beauty is a joy for ever.” त्यामुळे matter आणि manner दोन्ही गोष्टींकडे नीट लक्ष देऊन उत्तरपत्रिका लिहा. तुमची उत्तरपत्रिका पाहून परीक्षक नक्की म्हणेल : व्वा !! किती छान पेपर लिहिला आहे! वाचून समाधान वाटले तर मग, Best of Luck!!

-Team MissionSSC

www.missionssc.com

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: