SSC HOTS Science Tips

विद्यार्थी मित्र / मैत्रिणींनो,

Science  विषयाचे अनुभवी शिक्षिका डॉ. सौ. सुलभा विधाते तुमच्या सोबत काही important टिप्स share करणार आहेत

Science विषयातील HOTS प्रश्नांचा अभ्यास करताना खालील गोष्टींकडे लक्ष द्यावे :

– HOTS प्रश्नांमध्ये विषयांतर्गत विविध शाखांचे एकत्रीकरण असते. उदा. जीवशास्त्रातील पेशीची रचना आणि  त्यात घडणाऱ्या रासायनिक प्रक्रिया यांचे एकत्रीकरण करून HOTS प्रश्न तयार होतो.

– पूर्वी तार्किक (Logical) विचारसरणीनुसार प्रश्न विचारले जायचे . आत्ता या तर्कसंगत विचारसरणीला विस्तृत करून बहुविध प्रज्ञेची ( Multiple Intelligence ) जोड लावली जाणार आहे.

– HOTS प्रश्नांची काही उदाहरणे :

• आधुनिक आवर्तसारणीतील मूलद्रव्ये लिहा (प्रमुख) हा झाला स्मरणावरील प्रश्न . तर आधुनिक आवर्तसारणीतील

‘ A ‘ या आद्याक्षरापासून सुरु होणाऱ्या दोन मूलद्रव्यांची नावे लिहा व त्यांची वैशिष्ट्ये लिहा हा झाला ‘HOTS प्रश्न ‘. येथे स्मरण , आकलन व उपयोजन या तीनही क्षमता आजमावल्या जातात.

• धातूंचे गुणधर्म  अभ्यासा किंवा लिहा याऐवजी धातूंचा मानवावर कशाप्रकारे परिणाम होतो ते तुमच्या स्वतःच्या अनुभवातून सांगा हा झाला ‘ HOTS ‘ प्रश्न .

• जर आपल्या आहारात ‘ लोह ‘ नसेल तर काय होईल ? त्याचे शरीरावर कोणते परिणाम होतील?

• एखाद्या मूलद्रव्याचा अणुक्रमांक दिला असता त्याचे आवर्तसारणीतील स्थान, कारण व गुण वैशिष्ट्ये विचारणे हा झाला उच्चतम क्षमतेचा (HOTS) प्रश्न.

– काही प्रश्न मुक्तोत्तरी स्वरूपांचे असतील . या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थी त्यांचे आकलन , दृष्टीकोन यानुसार लिहीतील त्यामुळे ती उत्तरे वेगवेगळी असू शकतील . म्हणजेच एकाच प्रश्नाला एकापेक्षा जास्त बरोबर उत्तरे असू शकतील . या उत्तराची भाषा पाठ्यपुस्तकाची नसून विद्यार्थ्याची स्वतःची असेल.

– आकृतीमधील चुका दुरुस्त करणे किंवा गाळलेले भाग पायऱ्या शोधणे या प्रकारचे HOTS प्रश्न असू असतील.

– एखादा परिच्छेद देऊन त्यावर आधारित HOTS प्रश्न विचारले जाऊ शकतात.

– HOTS प्रश्नांचा अभ्यास करताना गणित व विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकातील कृतींवर , स्वाध्यायांवर व आकृत्यांचा सराव

करण्यावर भर द्या. नवीन प्रश्नप्रकारांचा अभ्यास करा . Scienceच्या पाठ्यपुस्तकात ‘ HOTS ‘ प्रश्नांचा समावेश आहे. हा समावेश काही प्रमाणात कृतींमध्ये आहे तर काही प्रमाणात स्वाध्यायात आहे . फक्त ‘ HOTS प्रश्न ‘ म्हणून निर्देशित केलेला नाही. म्हणूनच, पाठ्यपुस्तकाचा सखोल अभ्यास हीच यशाची गुरुकिल्ली आहे !

www.missionssc.com

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: