Tips For SSC Sanskrit – 40 Marks

प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रीणीनों

परीक्षेला जाता जाता ……

बोर्डाचे झालेले पहिले पेपर पाहून तुमचा विश्वास नक्कीच वाढला असणार ! त्यामुळे अभ्यासाचा आणि परीक्षेचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी मित्रांनो आज आपण पुन्हा भेटत आहोत.

–संयुक्त संस्कृत  ४० गुण

प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यानुसार

प्र.१ अ] मराठी/ इंग्रजीत भाषांतर करा.   १० गुण

दोन उतारे विचारले असले, तरी सर्व उतारे सोडवून ठेवा.

१) गोष्ट पूर्ण भूतकाळात लिहा. ‘एक राजा असतो.’ ही रचना चूक आहे. त्याऐवजी ‘एक राजा होता.’ असे करा.

२) इंग्रजी माध्यमाच्या मुलांनी special nouns देवनागरीत लिहा; पण वर-खाली लिहू नका. उदा. He composed a book named ‘अष्टाध्यायी’ असे न लिहिता-

He composed a book named ‘अष्टाध्यायी.’

३) पाणिनी, चतुरक हे लिहिताना भाषांतरात विसर्ग देऊ नका.

ब] पद्य भाषांतर ६ गुणांसाठी ६ ओळींचे भाषांतर अपेक्षित पण सर्व भाषांतरे लिहा.

१) शब्दशः भाषांतर लिहा. श्लोकाचा गोळा बेरीज अर्थ नको.

२) वचनावर विशेष लक्ष द्या.

जसे- सुलभः पुरुषा……

प्र.२ अ] मराठी / इंग्रजीत उत्तरे लिहा. ४ गुण.

१) किमान तीन प्रश्न तरी सोडवा.

२) पाठांची नावे पक्की माहिती असू द्या. (प्रस्तावनेसाठी)

ब) सुभाषितलेखन–   ४ गुणांसाठी २ सुभाषिते

१) विद्यार्थ्यांनी सर्व म्हणजे ५ ही सुभाषिते लिहावीत.

२) सुभाषितमाला- १, २ व काव्यशास्त्रविनोद- हे पाठ त्यासाठी तयार करा. मनाने संधी सोडवू नका.

प्र.३ अ) जोड्या जुळवा. २ गुण

स्तंभ आखून हा प्रश्न सोडवा.

१) वाक्येच्या वाक्ये लिहू नका.

२) 1-b, 2-c असे लिहायचे टाळा.

ब) योग्य पर्याय. ३ गुण.

१) योग्य उत्तर घालून वाक्ये लिहा.

२) सर्व वाक्ये सोडवा.

३) पर्याय लिहून घेऊ नका.

क) समास १ गुण

चारही समास उतरवून घेऊन त्यांची नावे लिहा.

नावांची अचूकलेखनाची तयारी करा.

ड) नाम / सर्वनामाचे योग्य रूप १ गुण

१) प्रत्येक पाठाच्या स्वाध्यायातून हा प्रश्न तयार करा.

२) केवळ उत्तर न लिहिता पूर्ण वाक्य लिहा.

३) उत्तराला अधोरेखन करा.

प्र.४ अ) रूपे ओळखा.

१) स्वाध्यायातील सर्व रूपे पुन्हा पुन्हा सोडवा. अक्षरशः येत नसतील, तर पाठ करा.

२) सर्व रूपे सोडवा.

३) त्याउलट त्वान्त, तुमन्त, ल्यबन्त हा एकटा शब्द जरी लिहिलात, तरी पूर्ण १ गुण तुम्हाला मिळू शकतो.

ब) क) समानार्थी व विरुद्धार्थी अनुक्रमे. प्रत्येकी १ गुण

प्रत्येक प्रश्न अर्ध्या गुणासाठी विचारला जातो. १/४ गुण देण्याची तरतूद नसल्याने एका प्रश्नाला २/३ उत्तरे देऊन ठेवा. ४ समानार्थी व ४ विरुद्धार्थी सर्व सोडवा. ज्याचे उत्तर येत नसेल, असा विरुद्धार्थीचा प्रश्न सोडून द्या. त्याला पाठीमागे ‘अ’ लावण्याची चूक करू नका. जसे- विदेश: – अविदेशः ×.

ड) संधी सोडवा. २ गुण

चार ही संधी प्रश्नपत्रिकेतून उतरवून मगच उत्तरे लिहा. प्रत्येक संधी मनातल्या मनात ४ वेळा हळू हळू वाचा. जसे- मनस्येकम्

प्र.५ अ) संस्कृतात उत्तरे लिहा. ३ गुण

१) ५ म्हणजे सर्व संस्कृत उत्तरे लिहावीत.

२) कः, क, कुत्र या शब्दांच्या जागी योग्य ते उत्तर जोडून प्रश्नातील बाकीचे शब्द जसेच्या तसे उतरवून घ्या. जसे- कः किमपि न अपेक्षते ?

– आनन्द: नाम युवा किमपि न अपेक्षते |

OR

फेरमांडणी

तीन वाक्ये विचारलेली असतात. त्यांचे आकडे न टाकता योग्य क्रमाने ती वाक्ये लिहा. शंका असल्यास प्र.क्र. १ अ ची चाचपणी करा. एखाद्या वेळेस ही वाक्ये तुम्हाला तिथे मिळण्याची शक्यता असते.

-Team MissionSSC

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: