Geography Tips For SSC Board

प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो

भूगोल विषयाचे अनुभवी शिक्षक संदिप वाटवे आज  तुमच्या सोबत काही important टिप्स share करणार आहेत

विद्यार्थी मित्रांनो, भूगोल हा विषय तांत्रीक स्वरूपाचा असल्यामुळे पैकीच्या पैकी गुण मिळवणे शक्य आहे . ४ ते ५ वेळा पाठांचे वाचन होणे आवश्यक आहे.

१. १ गुणांच्या प्रश्नांची तयारी करताना प्रत्येक पाठातील माहिती स्वतंत्रपणे लिहून ठेवावी. उदा. लोकसंख्येची सर्वात जास्त / कमी घनता असेली राज्ये, साक्षरतेचे सर्वात जास्त / कमी प्रमाण असलेली राज्ये, एखाद्या पिकाच्या किंवा खनिजाच्या उत्पादनातील अग्रेसर राज्य गाय, म्हैस, बैल, शेळी, मेंढी यांच्या राज्य निहाय प्रजाती इत्यादी. या माहितीचा उपयोग नकाशात माहिती दाखवा या सारख्या प्रश्नांसाठी देखील करता येईल.

२. दोन गुणांकरिता कारणे लिहा सारख्या प्रश्नांची तयारी करताना ४ ते ५ स्वतंत्र मुद्दे करावेत. जर शक्य झाले तर नकाशा, आकृती, आलेख यांचा वापर करावा.

उदा.

१. भारतात तेल शुद्धीकरण कारखाने किनारी भागात उभारले जातात. या प्रश्नाचे उत्तर लिहून झाल्यावर भारताचा नकाशा स्टेन्सिलच्या सहाय्याने काढायचा आणि त्यामध्ये विशाखा पट्टणम, कोची, हल्दीया या सारखी दोन ठिकाणे दाखवायची.

२. स्थलांतरित शेतीतील उत्पादन अल्प असते. याचे उत्तर लिहून झाल्यानंतर डोंगर उतारावरील झाडे असलेली जागा आकृतीत दाखवायची आणि दुसऱ्या आकृतीत तेथील वने नष्ट केलेली दाखवायची.

३. टिपा लिहा. हा दोन गुणांचा प्रश्न लिहिताना ४ ते ५ मुद्दे लिहिणे. त्यानंतर आकृती काढणे.

उदा.

१. पडित क्षेत्राची व्याख्या लिहावी, त्याखालील क्षेत्र लिहावे, शेतकरी एक दोन वर्ष जमीन पडित का ठेवली जाते हे लिहून झाल्यानंतर एक आयताकृती शेतीचे क्षेत्र दाखवावे त्यात एका भागात लागवडी खालील क्षेत्र दाखवावे.

२. आलेखावर आधारित दोन गुणांचा प्रश्न विचारला जातो. सर्वसाधारणपणे रेशालेख, स्तंभालेख, विभाजित आयत, विभाजित वर्तुळ एवढेच प्रकार येतात. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आलेखाला शिर्षक  देणे तसेच आलेखाचे प्रमाण लिहीणे. जर प्रमाण लिहिले नाही तर १ गुण कमी होऊ शकतो. आलेखावर आधारित १ गुणांचे ४ प्रश्न विचारले जातात त्यांची काठिण्य पातळी  कमी असते.

३. नकाशात माहिती दाखवा या प्रश्नाकरिता बिंदू निर्देशन पद्धती, रेषा पद्धती, क्षेत्र स्थान यावर आधारित प्रश्न विचारले जातात. बिंदू पद्धती मध्ये केवळ एक बिंदू वापरून स्थान दाखवायचे. उदा. कांडला बंदर, कोलकत्ता, विशाखा पट्टणम, बंगळूरू इत्यादी. अणू विद्युत प्रकल्प देखील विचारले जाऊ शकतात. रेल्वे मार्ग, जल मार्ग दाखवताना त्या मार्गावरील महत्वाचे एक ठिकाण दर्शवणे आवश्यक आहे. उदा. मुबई – नागपूर – कोलकत्ता रेल्वेमार्ग, चेन्नई – विशाखा पट्टणम – पराद्वीप – कोलकत्ता जलमार्ग. विमानमार्ग दाखवताना सरळ रेषा काढून विमान मार्ग दाखवावा. एखादे क्षेत्र किंवा राज्य दर्शवण्यासाठी प्रश्न विचारला जातो.

उदा.

१. साक्षरतेचे सर्वाधिक प्रमाण असलेले राज्य – केरळ.

२. गव्हाच्या उत्पादनात अग्रेसर राज्य – उत्तर प्रदेश

३. भुईमुगाच्या उत्पादनात अग्रेसर राज्य – गुजरात

४ गुणांच्या प्रश्नांसाठी महत्वाचे पाठ (४, ५, ६, ७, १०, ११ ब)

प्र.४ हा दिर्घोत्तरी प्रश्न सोडवताना जर नकाशा मध्ये एखादी माहिती दाखवा आणि सविस्तर माहिती लिहा या सारख्या प्रश्नात १ गुण नकाशा काढून माहिती दाखवण्यासाठी असतो आणि ३ गुण लिखाणासाठी असतात.

उदा. भारताचा नकाशा काढा आणि मळ्यांची शेती करणारे एक राज्य दाखवा आणि मळ्यांची शेती यावर सविस्तर माहिती लिहा.

४ गुणांच्या प्रश्नामध्ये आकृती, नकाशा, आलेख यांचा वापर केल्यास उत्तर अधिक परिणामकारक होतो. पाठ्य पुस्तकातील सर्व आलेखांचे वाचन करून त्यांची सुरुवातीच्या वर्षांची किंमत आणि शेवटच्या वर्षातील किंमत लिहून ठेवा. त्या माहितीचा उपयोग २ आणि ४ गुणांच्या प्रश्नांसाठी होतो. उदा. भारतातून लोहखनिजाची निर्यात केली जाते – कारणे लिहा – याचे उत्तर लिहिल्या नंतर लोहखनिज उत्पादनाचा स्तंभालेख काढून १९६० आणि २००४ मधील उत्पादन दाखवा.

पूर्व परीक्षेपूर्वी किमान दोन प्रश्न पत्रिका विकल्पासह सोडवा आणि आपल्या शिक्षकांकडून त्या तपासून घ्या. लिखाणाचा जास्तीतजास्त सराव करा. तुमचे यश निश्चितच आहे.

-Team MissionSSC

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: