Tips For SSC Sanskrit – 80 Marks

प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रीणीनों

परीक्षेला जाता जाता ……

बोर्डाचे झालेले पहिले पेपर पाहून तुमचा विश्वास नक्कीच वाढला असणार ! त्यामुळे अभ्यासाचा आणि परीक्षेचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी मित्रांनो आज आपण पुन्हा भेटत आहोत.

प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यानुसार –

प्र.१ अ] मराठी/ English भाषांतर

१५ गुणांसाठी ३ गद्य उतारे असतात. पण आपण सर्व म्हणजे

१) ५ ही उतारे अचूकपणे लिहा. उताऱ्यांचा क्रम बदलू नका. एकही उतारा extra म्हणून शेवटी लिहू नका. हवे तर तीन उतारे प्रथम लिहून उरलेल्या उताऱ्यांसाठी रिकामी जागा सोडा.

२) इंग्रजी माध्यमाच्या मुलांनी विशेषनामे शक्यतो देवनागरीत लिहा; पण ती वर-खाली असू नयेत.

उदा. युधिष्ठिर started अश्वमेध.  त्याऐवजी युधिष्ठिर started अश्वमेध.

३) काळ व वचनाचे भान ठेवा. गोष्टींचे भाषांतर पूर्ण भूतकाळात करा. ‘एका वनात २ बैल राहत ‘असतात’ च्या ऐवजी ‘होते’

४) उताऱ्याची सुरुवात व शेवट नीट पाहून मगच भाषांतर लिहा.

ब]

१) आठ गुणांसाठी आठ ओळी भाषांतरित करणे अपेक्षित आहे. सर्व पद्य समूहांचे भाषांतर लिहा.

काव्यशास्त्रविनोदाचे स्पष्टीकरण द्या. उदा. छोटिका. [नरनारी समुत्वन्ना ……]

२) भाषांतर करताना एकवचन, बहुवचनावर लक्ष ठेवा. जसे ‘स्वात्मानं द्रष्टुमिच्छाचेत्…. येथे एकवचन वापरावे. ‘जर तुला स्वतःला पहायचे असेल, तर मलाच शरण ये.’

कोणत्याही गद्य / पद्य भाषांतराला संदर्भ लिहिणे बंधनकारक नाही. आपल्याला आहे त्या वेळात चुका न करता लिहिणे शक्य असेल, तरच लिहा. गुण हे भाषांतरासाठी आहेत. संदर्भासाठी नाहीत.

प्र.२ अ] मराठी/ English उत्तरे लिहिताना –

१) प्रस्तावना– १ ते २ ओळी

२) उत्तराचे मुद्दे– ४–५ ओळी.

३) तात्पर्य / Conclusion.

किमान ३ उत्तरे तरी लिहून ठेवावीत.

उत्तराची लांबी वाढल्यास : तपासणाऱ्याला त्रास होतो; चुकांची संख्या वाढते;

उत्तराच्या मुद्यांना अधोरेखन करा.

ब) सुभाषितलेखन–

१) ६ गुणांसाठी ३ सुभाषिते लिहावयाची असतात.

२) ५ विचारलेली असतात. ती सर्व लिहा.

३) पुस्तकात छापल्याप्रमाणे सुभाषिते लिहावीत–

जसे–  अना:सारैरकुटीलैरार्च्छिद्रै: सुपरीक्षितैः |

मनाने संधी सोडवून सुभाषिते लिहू नका.

प्र.३ अ) रूपे लिहा. ६ गुण

i) ४ नामे      – २ / २

ii) ४ सर्वनामे  – २ / २      ८वी, ९वी, १०वी

iii) ४ धातुरूपे  – २ / २

प्रश्न लिहून घ्या. मनात त्याच्यासारखा पाठ असलेला शब्द म्हणून पहा. पुन्हा प्रश्नातील विचारलेला शब्द पहावा. मग उत्तर लिहा- धनवत् प्र.ब.व. भगवत् प्रमाणे लिंग, वचन व विभक्ती बरोबर असल्याची खात्री करून मगच उत्तर लिहा.

ब) चार समास विचारलेले असतात. पण मुलांनो सर्व समास सोडवा. समास विग्रह करून सर्व समासांची नावे अचूक लिहा.

क) अधोरेखांकित शब्दसमूहाबद्दल लिहिताना वाक्य पूर्ण लिहा. केवळ सामासिक शब्द लिहू नका.

ड) व  इ) अनुक्रमे संधी सोडवा आणि करा. प्रश्न लिहून उत्तर लिहा.

प्र.४ अ) रूपे ओळखा.  Recognise the forms.  ३ गुण असतात.

विचारलेली सर्व रूपे लिहून ठेवा.

उत्तरे फुल फॉर्ममध्ये लिहा.

उदा. श्रुत्वा |- श्रु धातू (५ परस्मैष्ट)

पूर्वकालवाचक ,  धातुसाधित

त्वान्त   अव्यय.

नाम, सर्वनाम, विशेषण, धातू यांचा स्पष्ट उल्लेख करा.

विभक्ती, वचन ठळकपणे लिहा.

लिंग लिहिताना- पुंलिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी पूर्ण येत नसेल तर – पुं., स्त्री; नपुं. असे लिहा.

ब) जोड्या जुळवा- 1-b, 2-c असे लिहायचे टाळा.

‘अ’ ‘ब’ स्तंभ पाहून लिहा. वाक्ये प्रश्नपत्रिकेतून जशीच्या तशी उतरवून काढा म्हणजे चुका होणार नाहीत.

क) योग्य पर्याय निवडताना वाक्य पूर्ण लिहा. पर्याय उतरवून घेण्याची गरज नाही.

ड) व  इ) अनुक्रमे समानार्थी Synonyms आणि विरुद्धार्थी Antonyms प्रत्येकाला केवळ १/२ गुण असतो. शुद्धलेखनाची चूक झाल्यास १/४ गुण देण्याची तरतूद नसल्याने संपूर्ण गुण गमवावा लागतो. त्यासाठी : १) प्रत्येक प्रश्नाला २/३ शब्द लिहून ठेवा.

२) सर्व प्रश्न सोडवा.

३) ज्याचे उत्तर माहिती नसेल, असा शब्द सोडून द्या. त्याला विनाकारण ‘अ’ जोडून उत्तर बनविण्याचा प्रयत्न करू नका.

४) प्रश्नातील शब्द नीट वाचा. काही शब्द फसवितात.

जसे- रवः / रविः / काननम् / कनकम् /

फ) सूचनेनुसार बदल करा. येणारे विशिष्ट प्रश्न :

१) प्रयोग बदला.

२) अलं / मा.

३) त्वं / भवान्.

४) यदा-तदा- म्हणजेच सतिसप्तमी काढा.

५) पूर्वकालवाचक काढा.

पण मित्रांनो, भीती वाटून हा प्रश्न सोडूनच दिला असे मात्र करू नका.

सामासिक शब्दाऐवजी संख्यावाचके वापरा. हा प्रश्न आलेला आढळतो. (याच्या तयारीसाठी पुस्तक पान नं. ९२/९३ इं. मि. व्याकरणविवेचन ६ चा स्वाध्याय.)

प्र.५ अ) संस्कृतात उत्तरे लिहा. ४ गुण

५ प्रश्न विचारलेले असतात. ते सर्व सोडवून ठेवा. प्रश्नातील कस्य, कीदृशम् कदा इत्यादी शब्दांच्या जागी उत्तरांचे शब्द लिहा. बाकीचे शब्द प्रश्नपत्रिकेतून उतरवा. मूळ उत्तराच्या शब्दाला अधोरेखन करा.

OR

फेरमांडणी- हाही प्रश्न संपूर्ण सोडवून ठेवा.

केवळ वाक्यांचे आकडे न लिहिता वाक्ये लिहा. आकडे घातले नाहीत तरी चालेल; पण वाक्यांचा अचूक क्रम लिहा. जर शंका असेल, तर प्र. १ अ मध्ये जरा चाचपडून पहा. तिथे त्याचे उत्तर मिळण्याची शक्यता असते.

ब) गद्य भाषांतर- नाट्य उतारे कमी आहेत. एक उतारा नक्की येतो. त्याची तयारी सर्वात जास्त करा.

क) पद्य भाषांतर- ४ गुणांसाठी ४ ओळी.

काही श्लोक सारखे आहेत. मुले एकाचे भाषांतर दुसऱ्याला देतात-

गुणा गुणज्ञेषु….. ||

गुणायन्ते दोषा ……||

प्र.६ निबंध एक विषय लिहिणे अपेक्षित आहे. ५ गुणांसाठी केवळ ५ वाक्ये लिहा. वाक्ये छोटी व सोपी असू दे. प्रत्येक नवीन वाक्य नवीन ओळीवर लिहा.

जसे- वृत्तपत्राणि /

१) वृत्तपत्रं नाम समाजपुरुषस्य मुखम् |

२) ‘लोकसत्ता’ ‘महाराष्ट्र टाईम्स’ ‘सकाळ’ एतानि मराठी वृत्तपत्राणि |

३) विविधासु भाषासु विविधानि वृत्तपत्राणि |

४) निखिलस्य विश्वस्य वार्ताः तानि प्रसारयन्ति |

५) वृत्तपत्रं नाम आबाल वृद्धानां मित्रम् |

विनाक्रियापदांची वाक्ये लिहा. हेच सर्व नियम चित्रवर्णनासाठी वापरा.

प्र.७ स्थूलवाचनावर ५ गुणांसाठी येणारा प्रश्न.

पूर्ण पानभर उत्तर लिहा. आपल्या स्वीकृत माध्यमातून लिहावयाचा असल्याने तो सर्वाधिक गुण मिळवून देतो.

कालिदासाच्या गोष्टीवर प्रश्न आल्यास गोष्टीतील श्लोक अचूकपणे उत्तरात येऊ देत. जसे ‘अद्य धारा……”

पश्चिमतटप्रदेशांवर प्रश्न असेल, तर प्रश्न काय आहे ते नीट वाचून उत्तर लिहा.

सह्याद्रीचे वर्णन असेल, तर पहिल्या २ श्लोकांचे सविस्तर वर्णन करा. पण कोकण किनारपट्टीचे वर्णन विचारले असेल तर मात्र ३ रे पुढील सर्व श्लोक.

कोकणातील लोकांवर प्रश्न असेल, तर श्लोक -६, ७ त्यातील ओळ ३ व ४, ८वा श्लोक, ११वा श्लोक.

-Team MissionSSC

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: