Important tips for SSC English (First Language)

प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रीणीनों

इंग्रजीच्या प्रथम भाषेच्या पेपर मध्ये विद्यार्थ्यांना खूप भरभरून गुण मिळतातच असे नाही. या पेपर मध्ये पास होणे अतिशय सोपे आहे पण स्कोरिंगसाठी मुलांना थोडी विशेष तयारी करावीच लागते, त्यासाठी आज तुमच्या सोबत English विषयाच्या अनुभवी शिक्षिका शोभा क्षीरसागर  important टिप्स share करणार आहेत.

१) या पेपर मधील जास्तीत जास्त गुण हे आकलनासाठी दिलेल्या उतारयांवर आधारीत असतात. पहिले ५ प्रश्न हे फक्त आकलनासाठी दिलेल्या उतारयांखाली विचारलेले असल्यामुळे उतारे काळजीपूर्वक वाचणे हे अत्यंत महत्वाचे ठरते.

२) उताऱ्यातील शब्द किंवा वाक्ये जशीच्या तशीच वापरून उत्तरे लिहिल्यास पूर्ण गुण मिळत नाहीत. उतारा समजून घेऊन प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या शब्दात स्वतःच्या वाक्यात लिहिता आली पाहिजेत. यासाठी शब्दभांडार विपुल असणे आवश्यक आहे.

३)  शब्दभांडार वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रत्येक धड्याखालील शब्दार्थाची उजळणी करणे (Study of Glossary) महत्वाचे ठरते. म्हणजे उत्तरे लिहिताना स्वतःचे शब्द वापरून वाक्ये जुळवणे सोपे होते.

४) ज्या विद्यार्थ्याचे वाचन/आकलन चांगले असते, त्याचे लेखन व्यवस्थित होते. पण वाचतानाच जर चुका होत असतील, तर त्या लिखाणात पण होतात व वाचन मंद गतीने असल्यास, लिखाणपण  हळूहळू चालते.

५)  तेव्हा वाचन आणि लिखाणाचा सराव असणे हे फार आवश्यक आहे.रोज १ पाठ तरी वाचवा एखाद्या पाठाच्या किंवा कवितेच्या प्रश्नोत्तराची तयारी करावी. यामुळे, लिहिताना महत्वाचे मुद्दे राहून जात नाहीत व नीटनेटके उत्तर लिहिण्याची सवय होते.

६) सुवाच्य, ठळक व मुद्देसूद उत्तरे लिहिण्यामुळे पैकीच्यापैकी गुण मिळतात, व यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो.

७) प्रत्येक प्रश्न शांतपणे, काळजीपूर्वक वाचल्यामुळे उत्तरे समाधानकारक रीतीने लिहिता येतात. गडबड गोंधळ, घाई इ. प्रकार टाळावेत. विराम चिन्हांचा वापर आवश्यकतेनुसार जरूर करावा.

८) प्रत्येक प्रश्नाला योग्य तो प्रश्न क्रमांक लिहावा व उत्तरपत्रिकेच्या सुरुवातीला वरती तुम्ही प्रश्नोत्तरे लिहिताय का, short  notes लिहिताय का पत्रलेखनाचा प्रश्न आहे हे नमूद करावे म्हणजे व्यवस्थितपणा /टापटीप दिसून येते.

९) प्रश्नांच्या मार्कानुसार उत्तराची लांबी तुम्ही लिहिण्याचा सराव करणे गरजेचे आहे. उगाच अनावश्यक माहितीचा भरणा उत्तरामध्ये नसावा. पण उत्तर हे नेहमी संपूर्ण वाक्यातच असावे,अर्धवट नको.तसेच short form अजिबात वापरू नयेत. eg. Society ऐवजी Soc. Road  साठी Rd, Colony  साठी Col.

१०)  पाठ्यापुस्तकातील शब्दांचे समानार्थी शब्द (Synonyms) विरुद्धार्थी (Antonyms) व सारख्या उच्चारांचे शब्द (Homophones) याचा नीट अभ्यास करावा. कवितेमधील Figures of speech ची पण नीट उजळणी केली असल्यास Scoring ला बाधा येत नाही.

११) पत्रलेखनामध्ये सुयोग्य भाषा वापरावी. Formal letter साठी official भाषा वापरावी. डायलॉग रायटिंग मध्ये American usages  टाळणे. Hi, What’s up वगैरे पेक्षा Hello, What are you doing ही भाषा योग्य असते. Writing skills मध्ये आवर्जून लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे length of the right-up. उत्तर शक्यतो १ पानभर असावे. अतिमोठे उत्तर घातक ठरते.

१२) उत्तरांमध्ये किंवा कल्पना विस्तार अथवा निबंधासारख्या प्रश्नांमध्ये काही सुविचार किंवा Quotations, म्हणी,वाक्प्रचार, keywords वगैरे वापरले असल्यास त्याला आठवणीने अधोरेखित करावे.यामुळे परीक्षकाचे लक्ष वेधून घेण्यास मदत होते.

१३) दिलेल्या वेळे मध्ये पेपर पूर्ण व्हावा म्हणून वेळेचे काटेकोरपणे नियोजन करावे. घाईघाईत शेवटची उत्तरे लिहिण्यास लिखाणामध्ये चुका (Spelling mistakes) होतात ते टाळावे. पेपर लिहून झाल्यावर नीट, लक्षपूर्वक वाचावा.

१४) उगाचच Extra प्रश्न सोडविण्याचा मोह टाळावा. जेवढे  आवश्यक आहे ते, व तुम्हाला जो प्रश्न जास्त चांगल्या पद्धतीने लिहिता येतो आहे तो लिहावा. यामुळे वेळेचे भान राहील व गोंधळ होणार नाही. या पेपर मध्ये ८० पैकी ७२ मार्क मिळवणारे विद्यार्थी आहेत. सर्वांग सुंदर,नीटनेटका पेपर म्हणजे परीक्षकासाठी मार्क देण्याची पर्वणीच असते.जे जे उत्तम ते साधण्याचा प्रयत्न करा व जास्तीतजास्त मार्क मिळवून यशाची उत्तुंग शिखरे गाठण्याची मनीषा बाळगा. तुमच्या प्रयत्नांला यश मिळेल.

BEST OF LUCK!

www.missionssc.com

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: