Free Seminar – Dealing with HOTS!!

प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो

इ. १० वीच्या शालांत परीक्षेला फक्त ३ महिने राहिले आहेत. नवीन परीक्षापद्धतीमध्ये ‘Higher Order Thinking Skills (HOTS)’ वर आधारित प्रश्न परीक्षेत विचारले जाणार आहेत. परीक्षेमध्ये उत्तम गुण मिळवण्याच्या दृष्टीने HOTS प्रश्न बरोबर सोडवणे आवश्यक आहे. अश्या प्रकारच्या प्रश्नांचे नेमके स्वरूप आणि काठीण्यपातळी (difficulty level) समजून घेणे विद्यार्थी व पालकांसाठी गरजेचे आहे.

HOTS या विषयावर उत्तम मार्गदर्शन करण्याची गरज लक्षात घेऊन एड्नेक्सा या Online Education क्षेत्रातल्या संस्थेने ‘MissionSSC’  या उपक्रमांतर्गत  १० वीचे विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यासाठी तज्ज्ञांची व्याख्याने व त्यांच्याशी प्रश्नोत्तरातून संवाद असा मोफत कार्यक्रम शनिवार दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी ११  वाजता शिवाजी मंदिर, दादर येथे आयोजित केला आहे. महाराष्ट्र टाईम्स या उपक्रमाचा मिडिया पार्टनर आहे.

प्रस्तुत कार्यक्रमात HOTS अंतर्गत विचारले जाणाऱ्या प्रश्नांचे स्वरूप, त्यासाठी करावयाचा अभ्यास याबद्दल ज्येष्ठ शिक्षक श्री. संजय रानडे आणि सौ. अजिता देशमुख मार्गदर्शन करणार आहेत. HOTS प्रश्नांचा सराव कसा करावा याबाबतही माहिती मिळणार आहे. या निमित्ताने मागच्या वर्षीच्या SSC परीक्षेत विचारले गेलेले HOTS चे प्रश्न आणि त्यांची उत्तरे प्रत्यक्ष बघण्याची संधी विद्यार्थी व पालकांना मिळणार आहे.

इ. १० वीचे मराठी, सेमी-इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी हा कार्यक्रम खुला आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी व पालकांनी कृपया पुढील क्रमांकांवर संपर्क साधावा : 9011041155 / 9011031155. अथवा  ‘www.missionssc.com‘  या संकेतस्थळाला भेट द्यावी.

-Team MissionSSC

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: