How to prepare for SSC History?

प्रिय विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो

सामाजिक शास्त्राचे अनुभवी  शिक्षक संदिप वाटवे तुमच्या सोबत काही important टिप्स share करणार आहेत

सामाजिकशास्त्र  भाग १ या विषयात ४० पैकी ४० गुण मिळवण्यासाठी

आपल्याला पाठ्यपुस्तकाचे नियमित वाचन करावे लागणार आहे. पुढील ८० ते ९० दिवसांचे नियोजन करायचे आहे. दररोज दोन पाठांचे वाचन आणि त्यामधील महत्त्वाच्या  प्रश्नांचे लिखाण केल्यास डिसेंबर महिन्यात किमान दोन वेळा वाचन आणि लिखाणाचा सराव होईल. जानेवारी महिन्यात पूर्व परीक्षेच्या आधी आपली किमान एक प्रश्नपत्रिका विकल्पासह सोडवलेली पाहिजे. त्यानंतरच्या काळात तीन सराव प्रश्नपत्रिका विकल्पासह सोडवायच्या आहेत.

सराव प्रश्नपत्रिका सोडवताना उत्तर लेखनाच्या पद्धतीत थोडासा बदल केल्यास आपली उत्तरे आधी अचूक येतील.

१. थोडक्यात उत्तरे लिहा  (२५ ते ३० शब्दांत)

२. कारणे लिहा.  (२५ ते ३० शब्दांत)

या दोन गुणांच्या प्रश्नां करिता ४ ते ५ मुद्दे स्वतंत्र लिहावेत.

३. तीन गुणांच्या प्रश्नां करिता पार्श्वभूमी हा स्वतंत्र मुद्दा सुरवातीला लिहावा त्यामध्ये ३ ते ४ मुद्दे लिहावेत.

उदा.  बोस्टनची चहा पार्टी यावर टीप लिहिताना पुढील मुद्दे लिहेवेत

पार्श्वभूमी

१. ईस्ट इंडिया कंपनीला आलेले आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी १७७३ मध्ये वसाहतींवर चहाचा कायदा लादण्यात आला.

२. १७७३ च्या कायद्यान्वये वसाहतींना ईस्ट इंडिया कंपनीकडूनच चहा खरेदी करणे बंधनकारक होते.

३. चहाच्या व्यापाराची ईस्ट इंडिया कंपनीला मक्तेदारी प्राप्त झाली.

४. चहाच्या कायद्यामुळे वसाहत वाले नाखूष होते.

मुख्य उत्तर:

१. ‘डार्ट माउथ’ हे पहिले जहाज बोस्टन बंदरात दाखल झाले ………इथपासून या घटनेला बोस्टनची चहा पार्टी असे संबोधले जाते इथपर्यंत पाठ्यपुस्तका मधील माहिती लिहावी त्यानंतर या घटनेचा मुख्य परिणाम लिहावा.

या घटनेचा परिणाम – (१) इंग्लंड आणि वसाहती मधील तणाव वाढला.

४  गुणांच्या प्रश्ना करिता  पार्श्वभूमीत ३ ते ४  मुद्दे लिहेवेत.

मुख्य उत्तरात ६ ते ७ मुद्दे लिहावेत.

पाठ्यपुस्तकात काही माहिती पानाच्या शेवटी दिलेली आहे.

उदा. पाठ १

लोकहितवादींनी इंग्रज सरकारने भारतात संसदीय पद्धतीचा अवलंब करावा असे सुचवले आहे.

(१८४८  प्रभाकर मधील शतपत्रांचा संदर्भ)

उदा.२

रशीयन राज्यक्रांतीच्या पाठात भारतातील पंचवार्षिक योजना ही भारताने रशीयात केल्या गेलेल्या आर्थिक नियोजनाच्या आधारावर विकसित केली आहे.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे साम्यवादाने भारावून गेले होते अशी माहिती मुख्य उत्तर लिहून झाल्यावर लिहिल्यास त्याचा चांगला परिणाम होतो.

गाळलेल्या जागा भरा , जोड्या लावा या सारख्या प्रश्नांच्या तयारीसाठी पुस्तकाचे सातत्याने वाचन करणे आवश्यक आहे. काही ठळक घटनांच्या तारखा आणि वर्षे यांची यादी करा. कारणे लिहा, दीर्घोत्तरी प्रश्नांची उत्तरे लिहितीना त्यांचा संदर्भ म्हणून उपयोग होईल.

औद्योगिक क्रांती, पाश्चात्य साम्राज्यवादाचा पाठ, निर्वसाहतीकरण या पाठांच्या तयारी करिता इयत्ता ८ वी च्या पाठ्यपुस्तकातील काही पाठ संदर्भासाठी वाचावेत.

उदा.

औद्योगिक क्रांतीच्या काळातील शोध, इंग्रजांनी भारताच्या विविध भागात आपली सत्ता कशा  प्रकारे प्रस्थापित केली, मवाळ आणि जहाल मतवादी यांचे योगदान ,क्रांतीकारकांचे  योगदान,असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, चलेजावची चळवळ इत्यादी.

पाठ १,३,४,११ मधून ३ गुणांचे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता जास्त आहे.

पाठ१,२,३,५,६,७,८,९, मधून ४ गुणांचे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता जास्त आहे.

तुमचे पाठ्यपुस्तकाचे परिणामकारक वाचन झाल्यानंतर तुम्हीच एक दोन प्रश्नापत्रिका तयार करून त्यांची आदर्श उत्तरे लिहा. आपल्या दोन तीन मित्रांनाही असे काम करायला सांगा. आपल्या प्रश्नापत्रिका आणि आदर्श उत्तरपत्रिका यांची मित्रांच्यात अदलाबदल करा. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आणि उत्तरे पाहायला मिळतील.

संदीप रवींद्र वाटवे.

www.missionssc.com

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s

%d bloggers like this: