SSC Science Exam Tips

विज्ञान आणि तंत्रज्ञान

विद्यार्थी मित्रांनो ,

इ . वी बोर्डाच्या परीक्षेसाठी आता फक्त दोन महिने राहिले आहेत१० . या दोन  महिन्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाच्या परीक्षेची तयारी कशी करावी, याविषयी डॉक्टर सुलभा विधाते काही महत्त्वाच्या टिप्स देत आहे. पाठ्यपुस्तकाचा सखोल अभ्यास ही यशाची गुरुकिल्ली आहे. या पाठ्यपुस्तकात अनेक कृती आहेत. त्यांचा अभ्यास करताना पुढील मुद्दे वापरा.

∙प्रकरणाचे वाचन  – प्रत्येक प्रकरण सखोल व नीट एकाग्रतेने  वाचावे.

∙स्वअध्ययन – आत्तापर्यंत केलेला अभ्यास मुद्द्यांच्या स्वरुपात पुस्तकात न पाहता लिहून काढणे. प्रश्न वाचणे व फक्त मुद्दे लिहिणे.

∙कृतींचा अभ्यास – प्रत्येक प्रकरणातील महत्त्वाच्या ५ कृती वाचून त्यावर विचारलेले प्रश्न वाचणे व त्यांची उत्तरे तोंडी सांगणे.

∙’विचार करा’ – ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान’ या पाठ्यपुस्तकात ‘विचार करा’ या शीर्षकाखाली काही प्रश्न दिले आहेत ते वाचून सोडवणे. स्वतःला त्यांची उत्तरे येतात का ते पाहाणे. उत्तरे आली नाहीत किंवा आतापर्यंत हे प्रश्न सोडवले नसतील तर ते जरूर सोडवावेत.

∙’तुम्हाला हे माहित आहे का?’ ” Do you know ” या शीर्षकाखालील माहिती वाचावी HOTS प्रश्नांची तयारी होईल.

∙Principles (तत्त्वे) व Laws (नियम) = पाठ्यपुस्तकातील तत्त्वांचा अभ्यास करा व ती तत्त्वे दैनंदिन जीवनात कोठे वापरतात ; ते  अभ्यासा. उदा. A.C . Generator चे तत्त्व. तसेच ‘नियम अभ्यासा. या प्रत्येक नियमाच्या daily application ची दोन तरी उदाहरणे तुम्हाला देता आली पाहिजेत.

उदा . ज्यूलचा नियम.

∙आवर्तसारणी -Modern Periodic Table चा अभ्यास करताना s,p,d,f blocks चा अभ्यास करा. १ ते २० Atomic numbers असलेली मूलद्रव्ये, त्यांचे Electronic Configuration व daily use सांगता आला पाहिजे. महत्वाच्या मूलद्रव्यांचे प्रत्यकी दोन उपयोग यायला हवेत.

∙आकृत्यांचा सराव –  पाठ्यपुस्तकात अनेक आकृत्या आहेत.त्यांचा सराव करावा. तो करताना प्रमाणबद्धता, नावे देणे व रचना योग्य हवी. तसेच आकृत्यांवर आधारित प्रश्नप्रकार विविध आहेत. उदा.

a. Label the given diagram.

b. Find out missing part.

c. Complete the figure.

d. What does it indicate ?

e. Write the function of given part.

f. Write the use of it.

या प्रश्नप्रकारानुसार सखोल अभ्यासाची गरज आहे. आकृत्यांसाठी रंगीत पेन किंवा पेन्सिल  वापरू नये. ‘विभाग B’ मध्ये खूप आकृत्या आहेत. विशेषतः ३ किंवा ५ गुणांसाठी आकृती अवश्यक आहे.

∙टिपा किंवा वर्णनात्मक प्रश्न – यांची तयारी करताना आकृती असल्यास त्या आकृतीने अभ्यासाला सुरुवात करावी.

उदा. Electric Motor यात  principle, construction, working, use and figure हे मुद्दे येतात. तेच डोळ्यांसमोर ठेवून प्रथम आकृती काढावी. व तोंडी working व इतर मुद्दे सांगावेत. याप्रमाणे अभ्यास केला तर दीर्घकाळ स्मरणात राहाते.

∙वस्तुनिष्ठ प्रश्न – यात अनेक उपप्रकार आहेत.

१. चूक  की बरोबर ठरवताना त्यांची कारणे सांगता आली पाहिजेत.

२. सहसंबंध सांगताना Lateral thinking करता आले पाहिजे.

३. ३ columns मधील जोड्या जुळवताना logical thinking करता आले पाहिजे.

∙रासायनिक अभिक्रिया – यासाठी प्रकरण २ व ९ अभ्यासणे chemical reactionsव इक्वेशन्समध्ये balance हवा. त्यासाठी संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे.

∙संकल्पना चित्रण – Concept Map  चा अभ्यास प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी Concept map दिलेला आहे. त्याचे वाचन म्हणजे प्रकरणाची summary होय. ते जरूर वाचा. एखादी concept घेऊन त्यावर Concept map तयार करता येतो का ते पहा. उदा.  Photosynthesis

∙स्वाध्याय – पाठ्यपुस्तकातील सर्व  प्रकरणांखाली असलेल्या प्रश्नांच्या उत्तरांचा सराव करा.या प्रश्नांमध्येच HOTS प्रश्न आहेत. तसेच सर्व प्रश्नाप्रकारांचा समावेश आहे. वरील सर्व  मुद्यांनुसार भरपूर सराव,अचूक उत्तरलेखन व सर्व मुद्यांचा समावेश करून अभ्यास केलात, तर विद्यार्थी  मित्रांनो, यश तुमचेच आहे !

डॉ. सौ. सुलभा नितीन विधाते

सदस्य व समन्वयक

विज्ञान आणि तंत्रज्ञान

अभ्यासमंडळ, म.रा.मा. व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे.

-Team MissionSSC

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

%d bloggers like this: